HOD 1
ZP Logo

जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

E-HRMS संगणक प्रणाली

HOD 2
E-HRMS संगणक प्रणालीविषयी :

या संकेतस्थळाची निर्मिती श्री. अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून व श्री. राघवेंद्र घोरपडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर – E-HRMS संगणक प्रणाली ही जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी व कार्यालयीन अधिकाऱ्यांसाठी विकसित केलेली एक अत्याधुनिक डिजिटल सुविधा आहे. या प्रणालीचा उद्देश कर्मचारी व्यवस्थापनाची सर्व कामे संगणकीकृत पद्धतीने करून प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक व विश्वासार्ह करणे हा आहे.

या माध्यमातून प्रत्येक कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, नियुक्ती दिनांक, पदोन्नती, बदली, निवृत्ती, वेतन तसेच सेवासंबंधी इतर सर्व माहिती सुरक्षितपणे नोंदवली जाते. रजेची नोंद, कामकाज अहवाल, सेवा पुस्तिका आदींचे व्यवस्थापनही या प्रणालीद्वारे अधिक प्रभावीपणे करता येते.

कार्यालयीन अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र Office Login सुविधा उपलब्ध आहे, ज्याद्वारे कार्यालयीन स्तरावरील सर्व माहिती नियंत्रित करता येते. कर्मचाऱ्यांसाठी सोयीस्कर Employee Login पर्याय दिला असून, यामधून प्रत्येक कर्मचारी स्वतःची सेवासंबंधी माहिती सहज पाहू शकतो.

या प्रणालीमुळे वेळेची व श्रमांची मोठ्या प्रमाणावर बचत होते. परंपरागत कागदी नोंदींच्या तुलनेत ही पद्धत वेगवान, अचूक व सुरक्षित आहे. कर्मचारी व कार्यालय यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक बनविणे, कामकाजात पारदर्शकता आणणे आणि शासनाच्या डिजिटलायझेशन उपक्रमाला चालना देणे हे या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

एकंदरीत, E-HRMS संगणक प्रणाली ही जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरची एक अभिनव पाऊल आहे जी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवते.

हे संकेतस्थळ जिल्हा परिषेदेतील IT कक्षाचे प्रमुख श्री. पराग बीडकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, व त्यांचे सहकारी यांनी तयार केले आहे.